Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीRajasthan Accident : भीषण अपघात! भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच घरातील सहा जणांचा...

Rajasthan Accident : भीषण अपघात! भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच घरातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

ट्रकचालक फरार; सीसीटीव्हीत कैद झाला थरार

जयपूर : राजस्थानमध्ये हायवेवर एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर ट्रक आणि कारची जोरदार धडक लागली असून या अपघातात एकाच घरातील ६ जण ठार झाले. राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला.

हे कुटुंब सीकर जिल्ह्यातून रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेश मंदिराकडे जाण्यासाठी निघालं होतं. हायवेवर कार मागून वेगाने येत असताना समोरुन जाणाऱ्या ट्रकने यु-टर्न घेतला. यानंतर कार थेट जाऊन ट्रकवर आदळली असल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. मात्र ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजस्थानमध्ये झालेल्या या अपघातामुळे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री दिव्या कुमारी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

“दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर सवाई माधोपूर जिल्ह्यातील बाउली पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातात ६ नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. संबंधित अधिकाऱ्यांना पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” अशी माहिती भजनलाल शर्मा यांनी एक्सवरुन दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -