Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीक्राईम

Nashik Crime : पतीला कंटाळून महिलेने केले 'असे' काही!

Nashik Crime : पतीला कंटाळून महिलेने केले 'असे' काही!

पोटच्या दोन मुलींचा जीव घेत उचलले 'हे' कठोर पाऊल


नाशिक : नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पोटच्या दोन मुलींची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने एक व्हिडिओदेखील बनवला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


मिळालेल्या महितीनुसार, अश्विनी निकुंभ असे मृत महिलेचे नाव असून तिने आपल्या दोन मुलांना विष देऊन नंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पती आणि सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने असे खळबळजनक कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अश्विनी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्नील निकम आणि त्याचा भाऊ व बहीण यांच्या नावाने सुसाइड नोट लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये याबाबत व्हिडिओदेखील बनवला असल्याचे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान, जन्मदात्यीनेच स्वत:च्या मुलांचा जीव घेत तिने सुसाईड करण्यापूर्वीचा हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आल्याने परिसरातील नागरिकांकडून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment