Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीकमी पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो किडनीचा हा गंभीर आजार

कमी पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो किडनीचा हा गंभीर आजार

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. कारण आपले शरीर निरोगी ठेवण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. म्हणजेच पाणी आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करते. पाणीच्या कमतरतेमुळे केवळ आपले शरीर डिहायड्रेटच होत नाही तर किडनीमध्ये स्टोमची समस्याही निर्माण होते.

स्टोनचा त्रास असलेल्यांनी किती पाणी प्यावे?

किडनी स्टोनची समस्या आजकाल लोकांमध्ये वाढत चालली आहे. यामुळे अनेक जण या आजाराचे बळी ठरत आहेत. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते यामुळे किडनीमध्ये स्टोनचा त्रास होऊ लागतो.

किडनीमध्ये स्टोन कधी होतात?

किडनी आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यामुळे रक्त फिल्टर होण्याचे काम होते. किडनी खाण्यातून सोडियम, कॅल्शियम आणि इतर पोषकतत्वे गाळून रक्तातून खराब पदार्थ गाळून टॉयलेटच्या मार्गाने बाहेर काढण्याचे काम करते. मात्र शरीरात जेव्हा खनिजे आणि आयर्न मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा किडनी फिल्टर करू शकत नाही. अशा स्थितीत हे किडनीकडेच जमा होऊ लागते आणि तेथे स्टोन वाढायला लागतो.

कमी पाणी प्यायल्याने वाढतो किडनी स्टोनचा धोका

उन्हाळ्याच्या दिवसातून शरीरातून अधिक घाम निघत असतो. यामुळे शरीर डिहायड्रेट होते. तसेच शरीरात पाण्याची कमतरता भासते. डिहायड्रेशनच्या या स्थितीमध्ये किडनीमध्ये स्टोनचा त्रास अधिक वाढतो.या मोसमात कमी पाणी प्यायल्याने शरीरातील मीठ आणि खनिज पदार्थ क्रिस्टलचे रूप घेतात आणि स्टोन तयार होतो.

दिवसभरात किती पाणी प्यावे?

ज्यांच्या घरात कोणाला ना कोणाल किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी दिवसातून कमीत की २ ते ३ लीटर पाणी प्यावे. याशिवाय मीठ कमी खावे. तसेच चिकन आणि मटणही कमी खावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -