
पवई परिसरात व्हॅनमधून तब्बल ४ कोटी ७० लाख रुपये हस्तगत
मुंबई : देशभरात निवडणुकींची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना या काळात आचारसंहिता (Code of conduct) लागू झाल्याने निवडणूक आयोग प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अशा निवडणुकीच्या हंगामात पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून अथक प्रयत्न केले जातात. मात्र तरीही मोठ्या संख्येत पैशांचे व्यवहार होत असतानान दिसून येतात. काही दिवसांपूर्वीच भांडूप, सायन परिसरात पोलिसांनी संशयित रक्कम जप्त केली होती. ते प्रकरण ज्वलंत असतानाच पवई पोलीस स्टेशनच्या परिसरात नाकाबंदी करत असताना पोलिसांनी एका व्हॅनमधून कोट्यावधी रुपयांची रक्कम जप्त केली असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
पवई पोलिसांनी आयकर विभाग (Income Tax) आणि निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. या परिसरात नाकाबंदी करत एका व्हॅनमधून तब्बल ४ कोटी ७० लाखांची कॅश पकडली (Cash Seized) आहे. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी (Election Officer) त्या कॅशचा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला असल्याचे सांगितले.
रोकडासह गाडी आयकर विभागाच्या ताब्यात
पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिल्यानंतर निवडणूक अधिकारी त्या कॅशच्या बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला. यानंतर आयकर विभागाने या कॅश आणि गाडी आपल्या ताब्यात घेऊन ही रोकड कुठून आणली आणि एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की, निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता का? या संदर्भात अधिक तपास आयकर विभाग करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी सायनमध्ये १ कोटी ८७ लाख ८० हजार रुपये रोख रक्कम जप्त केली होती. भांडुपमध्ये ३ कोटी ९३ लाख रुपयांहून अधिक संशयित रक्कम जप्त करत पोलिसांनी कारवाई केली होती. याशिवाय, घाटकोपरमध्ये ७२ लाखांची रोख रक्कम सापडली होती. त्या प्रकरणावर पोलिसांकडून योग्य कारवाई करण्यात आली आहे.