Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीBMC News : होणार कायापालट? बीएमसीतर्फे 'या' धोकादायक इमारतींची यादी जाहीर

BMC News : होणार कायापालट? बीएमसीतर्फे ‘या’ धोकादायक इमारतींची यादी जाहीर

तब्बल १८८ इमारतींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : पावसाळा तोंडावर येताच मान्सूनपूर्व कामांना वेग येतो. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी ही मान्सूनपूर्व कामं हाती घेण्यात येतात. त्यामध्ये रस्त्यांची तसेच इमारतींची अशा अनेक कामांचा समावेश असतो. यंदाही पालिकेकडून पावसाळा पूर्व कामांची पाहणी झाली असून त्या कामांची यादी जाहीर झाली आहे. पालिकेतर्फे धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण झाले असून त्यात चक्क १८८ इमारतींचा समावेश असल्याचे सांगितले आहे.

पालिकेच्या सर्वेक्षणानुसार मुंबई शहरातील १८८ इमारती अतिधोकादायक असल्याचं निदर्शनास आलं आहे. या इमारतींमध्ये सर्वाधिक, तब्बर ११४ अतिधोकादायक इमारती मालाड, बोरिवली, मुलुंड, अंधेरी पश्चिम या भागांमध्ये म्हणजेच शहराच्या पश्चिम उपनगरात आहेत. तर, मुंबई शहरात २७ आणि पूर्व उपनगरात ४७ इमारतींची नोंद पालिकेनं केली आहे.

अशा प्रकारे धोकादायक इमारती ओळखल्या जातात –

  • इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणं, कॉलममधील काँक्रिट पडणं, इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखं भासणं, कॉलमला भेगा पडणं.
  • इमारतीचे बीम झुकल्यासारखं वाटणं, इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणं, इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत बदल दिसणं.
  • इमारतीच्या आर.सी.सी. चेंबर्स आणि विटांची भिंत यात भेगा दिसणं किंवा त्यांचं काँक्रिट पडणं, इमारतीत काही विशिष्ट आवाज होणं.

वरीलपैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास त्या इमारती धोकादायक असून, नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणत पालिकेच्या सूचनांनुसार इमारत तातडीनं रिक्त करणं गरजेचं असतं. तसेच आजुबाजूच्या इमारतींना याबाबतची सूचना दिली जाणंही आवश्यक ठरत असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -