
नवी दिल्ली: सीबीआयने मोठी कारवाई करताना दिल्लीच्या RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोड केला आहे. सीबीआयने रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांसह ९ जणांना अटक केली आहे. रुग्णांकडून उपचाराच्या नावावर लाच घेतल्याचा आरोप आहे.
अटक कऱण्यात आलेल्या लोकांमध्ये मेडिकल उपकरणांची पूर्ती करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे. हे लोक संपूर्ण रॅकेट चालवून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून उपचाराच्या नावावर मोठी रक्कम उकळत होते.
सीबीआयने लाच प्रकरणात आरएमएल रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांचा समावेश आहे. यात एक प्रोफेसर आणि एका असिस्टंट प्रोफेसरचा समावेश आहे. यांच्यावर गरीब रुग्णांकडून उपचाराच्या नावाने पैसे घेणे आणि मेडिकल उपकरणांचा सप्लाय करण्याच्या नावावरून डीलर्सकडून मोठी रक्कम उकळणे हे आरोप आहेत. सीबीआयने डॉक्टर्स आणि मेडिकल उपकरणांशी संबंधित डीलर्सच्या १५ ठिकाणांवर छापेमारी केली. सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये एकूण १६ आरोपांची माहिती दिली आहे.
आरएमएल रुग्णालयाचे असिस्टंट प्रोफेसर पर्वतगौडा यांना तब्बल अडीच लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांना ही लाच यूपीआयच्या माध्यमातून मिळाली होती. याशिवाय रजनीश कुमार जे आरएमएल रु्ग्णालयाच्या कॅथ लॅबमध्ये वरिष्ठ टेक्निकल इंन्चार्ज आहेत.
त्यांनाही अटक करण्यात आली. सीबीआयने कार्डिओलॉजी विभागात प्रोफेसर डॉ अजय राय, नर्स शालू शर्ममा, रूग्णालयाचे क्लार्क भुवल जैसवाल आणि संजय कुमार गुप्ता यांच्यासह पाच इतर लोकांना अटक करण्यात आली.