
मुंबई: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला लवकर यशस्वी व्हायचे असते आणि या शर्यतीत अनेकदा आपण आपली झोप घेणेही विसरतो. स्मार्टफोन्स, टीव्ही आणि इतर गॅजेट्सनी आपली झोप खराब केली आहे. आपण विचार करतो की हे सगळं नॉर्मल आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे की रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने बॉडी क्लॉक बिघडून जाते. यामुळे आपले शरीर आणि मेंदू दोन्हीवर परिणाम होतो.
बॉडी क्लॉक बिघडते
आपले बॉडी क्लॉक आपल्याला सांगते की कधी झोपायचे, कधी उठायचे ते. जेव्हा आपण रात्री उशिरापर्यंत जागतो तेव्हा आपले नैसर्गिक घड्याळ बिघडते. यामुळे आपली झोप आणि उठण्याच्या वेळेत गडबडी होते. याचा सरळ परिणाम आपल्या शारिरीक आरोग्यावर पडतो. जसे की थकवा जाणवणे, वजन वाढणे आणि आजारांचा धोका वाढणे. सोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
आरोग्यावर परिणाम
आपले शरीराचे घड्याळ २४ तासांमध्ये सूर्य आणि चंद्राप्रमाणे चालते. रात्री उशिरापर्यंत जागल्याने हे घड्याळ बिघडते. रात्री उशिरापर्यंत जागल्याने हे चक्र प्रभावित होते. तसेच आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवरही परिणाम होतो.
या शहरात रात्री जागतात लोक
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात कामाच्या वाढत्या ताणामुळे रात्री उशिरापर्यंत जागणे ही सामान्य बाब झाली आहे. खासकरून मोठ्या शहरांमध्ये चेन्नई, गुरूग्राम आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत काम केले जाते. यामुळे झोपेचे तास कमी होतात. नाईट शिफ्टचे जॉब आणि मोबाईल फोन्सच्या वापरामुळे झोपेतही व्यत्यय निर्माण होऊ शकते.