Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीरायगड लोकसभेत सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला

रायगड लोकसभेत सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला

निवडणूक लोकसभेची मात्र, विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला

पेण(देवा पेरवी): रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होणार आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चार-सहा महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे पाहीले जात आहे. त्यामुळे सर्वच आमदारांनी मतांचा जोगवा आपल्या उमेदवारांच्या पदरात पाडण्यासाठी जोर लावला आहे.

रायगड लोकसभा मतदार संघात पेण, अलिबाग, महाड, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी गुहागर हा एकमेव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे भास्कर जाधव हे गुहागरचे आमदार आहेत. तर पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड आणि दापोली मध्ये महायुतीचे आमदार आहेत. पेण येथे भाजपचे आमदार रविंद्र पाटील, अलिबाग येथे शिवसेनेचे आमदार (शिंदे गट) महेंद्र दळवी, श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाकच्या ) आमदार आदिती तटकरे, महाड येथे शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार भरत गोगावले, आणि दापोलीतून शिवसेना (शिंदे गटाचे) योगेश कदम आमदार आहेत.

बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्याचे राजकीय परिस्थिती 360 अंशाच्या कोनात फिरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. सहयोगी पक्षांशी जुळवून घेणे, नेते आणि कार्यकर्त्यांना अडचणीचे जात आहे. अशा वेळी नेते आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीचे दाखले लोकसभा निवडणूकीच्या प्रचार करवून घेतला जात आहे. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणूकीचे तह केले जात आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने या दोन प्रमुख पक्षांची ताकद दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आपले अस्तित्व आणि मतदारसंघावरील ताकद दाखविण्याची संधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने चालून आली आहे. चार-सहा महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक होणार असल्याने लोकसभा निवडणूकही आगामी विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रत्येक आमदारांना आपआपल्या मतदारसंघातून मताधिक्य देणे क्रमप्राप्त असणार आहे. अन्यथा चार-सहा महिन्यांनी होणाऱ्या निवडणूकीत त्यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच जण या लोकसभा निवडणूकीला गांभिर्याने घेतांना दिसून येत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -