Friday, May 9, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

सहा जागांसाठी पंतप्रधान मोदी घालणार मुंबईकरांना साद

सहा जागांसाठी पंतप्रधान मोदी घालणार मुंबईकरांना साद

१५ मे रोजी पहिली सभा तर १७ मे ला होणार रोड शो


मुंबई : अब की बार, चार सौ पारचा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठीचा एक भाग म्हणून मुंबईच्या सहा जागासाठी भाजपाने मेगाप्लान तयार केला आहे. मुंबईच्या सहा जागांसाठी महायुतीने कंबर कसली आहे. आता मुंबईतील सहा जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या प्रचारयंत्रणा सांभाळण्यासाठी निवडणुक मैदानात सक्रिय सहभागी होणार आहेत.पंतप्रधान मोदींची मुंबईत १५ मे रोजी मुंबईत पहिली जाहीर सभा होणार आहे. तर १७ मे रोजी रोड शो होणार आहे. अद्याप मोदींच्या सभेचे स्थळ निश्चित करण्यात आलेले नाही.


महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी मुंबईत सहा जागा आहेत, मुंबईच्या सहा जागांमध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य यांचा समावेश आहे. भाजपा मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्यमधून लढत आहे, तर शिंदे सेना मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्यमधून लढत आहेत.


मोदींच्या आतापर्यंत १६ ठिकाणी सभा


महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. मागील वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पंतप्रधान मोदींच्या सभांमध्ये वाढ झाली आहे. २०१९ सालच्या लोकसभा रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल ५१ दिवस प्रचार केला. देशभरात त्यांनी १४२ प्रचार सभा घेतल्या तर ४ रोड शो केले होते. सर्वाधिक ५० सभा या पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्यात घेतल्या होत्या.ही निवडणूक मोदींच्या नावावर लढवली जात असल्याने मोदींनी महाराष्ट्रात आतापर्यंत १६ ठिकाणी सभा घेतल्या आहेत. आतापर्यंत तीन टप्प्याचे मतदान पार पडले आहे.


मोदींचा भव्य रोड शो


मुंबईतील व्यावसायिक भाग आणि उच्चभ्रू वस्ती असलेला हा प्रदेश भारतातील सर्वात श्रीमंत नागरी भाग आहे. मुंबईवर कायमच शिवसेना ठाकरे गटचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. शिवसेना - भाजपा युती तुटल्यानंतर भाजप मुंबईसाठी अतिआग्रही आहे. स्थानिक मुद्दे किंवा स्थानिक वाद न बघता तसेच ठाकरे-पवार यांच्या सहानुभूतीच्या राजकारणाला न बळी न पडता राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक प्रचार आणि मतदान व्हावे, असा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठीच मोदी यावेळी जास्त मेहनत घेताना दिसत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच आता थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहे.

Comments
Add Comment