
अलिबाग : मुरुड जंजिरा परिसरात अलिबाग -मुरुड रस्त्यावर अंदाजे ५० वर्षे जुना असणाऱ्या पुलावर पर्यटकांची शनिवार रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मुरुड रस्त्यावर मजगांवमध्ये असलेल्या या पुलाला गेल्या अनेक महिन्यांपासून झाडाझुडपांनी विळखा घातला आहे.
कित्येक महिन्यांपासून झाडाझुडपांचा असलेला हा विळखा हटविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष पुरवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जोर धरीत आहे. मात्र या गोष्टीकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.