Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीक्राईम

Dharashiv news : धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच राजकीय वादातून एकाची हत्या!

Dharashiv news : धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच राजकीय वादातून एकाची हत्या!

दोन दिवसांपासून सुरु होता वाद


धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदानाच्या (Voting) तिसर्‍या टप्प्यात ठिकठिकाणी मतदान होत असताना धाराशिवमध्ये (Dharashiv) राजकीय वादातून एका तरुणाची हत्या (Murder case) करण्यात आली आहे. मतदान केंद्राजवळच (Voting centre) चाकूने भोसकून केलेल्या हत्येमुळे धाराशिव परिसरात खळबळ उडाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली आहे.


पाटसांगवी गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्र परिसरात दोन गटांमध्ये मतदान केंद्रावर मतदार आणण्यावरून हा वाद झाला. त्यातून एका गटाने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केला. त्यात एकाचा मृत्यू झाला. समाधान पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. तर ज्याने चाकू हल्ला केला त्या आरोपीचं नाव गौरव अप्पा नाईकनवरे असं आहे. या हल्ल्यात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमधील हा वाद चांगलाच धुमसत होता. आता मतदानाच्या दिवशी त्याचं निमित्त झालं आणि त्यातून ही हत्या झाली. सध्या तालुका रुग्णालयात समाधान पाटीलचा मृतदेह ठेवण्यात आला आहे तर चाकू हल्ला करणारा हल्लेखोर फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Comments
Add Comment