Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीRupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल

Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आज देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या अंतिम निर्णयानुसार, संपूर्ण देशभरात ईव्हीएम मशीनच्या (EVM Machine) आधारेच मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे आता ईव्हीएम मशीनच उमेदवाराचं भवितव्य ठरवणार आहे. मात्र, यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी चक्क या ईव्हीएम मशीनची पूजा केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या देशात धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे. मात्र, रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनवर धार्मिकरित्या ओवाळणी करत पूजा केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -