मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण ९३ मतदारसंघाचा समावेश होता. यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघ, गुजरातमधील २५, उत्तर प्रदेशातील १०, कर्नाटकातील १४, मध्य प्रदेशातील ९, छत्तीसगडमधील ७, बिहारमधील ५, आसाम ४, पश्चिम बंगालमधील ४, गोव्यातील २ आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांचा समावेश होता. यामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजता मतदान संपले, तेव्हा देशभरात सुमारे ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात या वेळेत ५४.०९ टक्के मतदान पार पडले.
यापैकी देशभरात सर्वाधिक मतदान ७५.०१ आसाममध्ये झाले तर सर्वात कमी मतदान ५४.०९ टक्के मतदान महाराष्ट्रात झाले.
दरम्यान, यामध्ये महाराष्ट्रातील बारामती, कोल्हापूर, सांगली या चर्चेतील लोकसभा मतदारसंघांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. यांपैकी बारामतीत सर्वात कमी ४७.८४ टक्के, कोल्हापुरात ६३.७१ तर ५२.५६ टक्के मतदान झाले.
तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील मतदान
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ५४.७५ टक्के
- रायगड – ५०.३१ टक्के
- लातूर – ५५.३८ टक्के
- सांगली – ५२.५६ टक्के
- बारामती – ४७.८४ टक्के
- हातकणंगले – ६२.१८ टक्के
- कोल्हापूर – ६३.७१ टक्के
- माढा – ५०.०० टक्के
- उस्मानाबाद – ५६.८४ टक्के
- सातारा – ५४.७४ टक्के
- सोलापूर – ४९.१७ टक्के