MI vs SRH: मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून सलामीवीर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने ३० बॉलमध्ये ७ चौकार आणि १ षटाकारच्या मदतीने ४८ धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा विशेष काही करु शकला नाही, ११ धावांवर तो बाद झाला. मयंक अग्रवाल ५ धावा करुन बाद झाला. नितीश रेड्डी २० धावांवर माघारी परतला. पीयूष चावला याने हेन्रिक क्लासेन याला २ धावावर बाहेरचा रस्ता दाखवला. मार्को जान्सेन १७ रन्स करुन बाहेर गेला.
मुंबईने हैदराबादला झटके देत बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र अडचणीच्या काळात कर्णधार पॅट कमिन्स याने नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादला १५० धावांचा टप्पा पार पाडता आला. तर मुंबईकडून कॅप्टन हार्दिक पंड्या आणि पीयूष चावला या दोघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले . हैदराबादने २० षटकात ८ गडी गमावून १७३ धावा केल्या.
हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना रोहित शर्मा ४ धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मार्को यान्सनने दुसरे षटक टाकले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर ९ धावा काढून इशान किशन बाद झाला. मयंक अग्रवालने त्याचा झेल घेतला. त्यानंतर आलेला नमन धीर देखील काही विशेष करु शकला नाही.
मुंबई बॅकफुटवर असताना सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी करत शतक झळकावले. ५१ चेंडूत १०२ धावा करत तो नाबाद राहिला. तिलक वर्माने देखील सुर्याला मोलाची साथ दिली. ३२ चेंडुत ३७ धावा करून तिलकदेखील नाबाद राहिला. या दोघांनी १४९ धावांची भागीदारी करत मुंबईच्या गोटात विजयश्री खेचुन आणला. मुंबईने हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला.