
मुंबई: मोबाईल फोन(mobile phone) आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनत चालला आहे. याशिवाय आपले आयुष्यच हल्ली अपूर्ण वाटते. मग ते ऑनलाईन पेमेंट असो वा सिनेमा पाहणे असो. आपली ही सर्व कामे फोनवरच असतात. मात्र समजा जर तुमचा फोन अचानक कुठे हरवला अथवा कोणीतरी चोरी केला तर? तुम्ही घाबरून जाल ना. अशातच आम्ही तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे फोन तुम्ही रिकव्हर करू शकता.
Find My Device
जर तुमच्या अँड्रॉई़ड फोनवर Google ची फांईड माय डिव्हाईस ही सुविधा अथवा आयओएस डिव्हाईसवर फाईंड माय आयफोन अॅक्टिव्ह करून घ्या. यामुळे मॅपवरून तुमच्या डिव्हाईसचा शोध घेता येईल.
Last Known Location
जर तुमच्या फोनचा जीपीएस सिस्टीम ऑन आहे तर फाईंड माय डिव्हाईसच्या सुविधेचा वापर करून तुम्ही मॅपवर लास्ट लोकेशनचा शोध घेऊ शकता.
Contact your Carrier
जर तुमचा फोन चोरी झाला अथवा हरवला तर तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायरला दुसऱ्या नंबरवरून फोन करून मदत घेऊ शकता.
आपल्या आसपासच्या लोकांकडे चौकशी करा
अनेकदा असे होते की आपण कुठेही फोन ठेवून येतो अधवा लक्षात राहत नाही. अशातच आपले मित्र, नातेवाईक यांना पुन्हा फओन करून विचारा
पोलिसांकडे तक्रार करा
जर तुमचा फोन हरवला आहे आणि बरेच प्रयत्न करूनही तो मिळत नसेल तर जवळच्या पोलीस ठाणे अथवा ऑनलाईन माध्यमातून तुम्ही एफआयआर दाखल करू शकता. सोबतच आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडरला फोन करून सिमही लॉक करून घ्या.