Sunday, July 14, 2024
HomeदेशLok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यात अमित शाह,नारायण राणे, उदयनराजे यांची प्रतिष्ठा...

Lok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यात अमित शाह,नारायण राणे, उदयनराजे यांची प्रतिष्ठा पणाला

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election 2024) तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९३ लोकसभेच्या जागांसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होईल. यातील अनेक लोकसभा मतदारसंघ असे आहेज ज्यांच्यावर साऱ्यांच्या नजरा असतील. जाणून घेऊया त्या महत्त्वाच्या जागांबद्दल…

तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे उमेदवार अमित शाह, एनसीपी(शरद पवार)गटाच्या सुप्रिया सुळे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे, सोलापुरातून प्रणिती शिंदे , साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाराष्ट्रातील लक्षवेधी लढती

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अनेक दिग्गज रिंगणात उतरले आहेत. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

माढा

भाजपचे रणजिंतसिंह नाईक-निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते-पाटील

सांगली – तिहेरी लढत

चंद्रहार पाटील, शिवसेना ठाकरे पक्ष विरुद्ध भाजपचे संजयकाका पाटील विरुद्ध अपक्ष विशाल पाटील

सोलापूर

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते

बारामती

राष्ट्रवादी(शरद पवार)गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार राष्ट्रवादी(अजित पवार गट)

सातारा

उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे

कोल्हापूर

कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती विरुद्ध शिवसेना(शिंदे गट) संजय मंडलिक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -