Friday, July 11, 2025

ICSE Board चा दहावी-बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींची बाजी

ICSE Board चा दहावी-बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींची बाजी

जाणून घ्या मार्कशीट कशी डाऊनलोड कराल?


नवी दिल्ली : काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) द्वारे आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल आज सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थी cisce.org या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहू शकतात. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षीही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.


दहावी व बारावी वर्गात मुलींनी मुलांवर मात केली आहे. दहावीमध्ये, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६५ टक्के आहे तर मुलांचे प्रमाण ९९.३१ टक्के आहे. तर बारावीमध्ये, ९८.९२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत आणि ९७.५३ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.




  • ICSE बोर्डाच्या cisce.org वेबसाइटला भेट द्या.

  • होम पेजवरील रिजल्ट्स टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ICSE निकाल वेबसाईट results.cisce.org या पेज दिसेल.

  • इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी येथे ICSE Result 2024 Link वर क्लिक करा. इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यासाठी, ISC Result 2024 Link वर क्लिक करा. वेगळ्या लिंक्स न मिळाल्यास कोर्स पर्यायातून ICSE किंवा ISC निवडा.

  • CISCE लॉगिन पेज उघडेल. तुमचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा कोड इथे टाका.

  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

  • हा निकाल तुम्ही डाऊनलोड करु शकता. तसेच प्रिंट करण्याचीही सोय आहे.

  • महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीजीलॉकरमध्येही तुम्हाला हा निकाल पाहता येऊ शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा