Thursday, March 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार होते?...

Devendra Fadnavis : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार होते? सत्य बाहेर आले तर बिंग फुटेल!

देवेंद्र फडणवीसांचा अमोल कोल्हेंना इशारा

शिरुर : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार होते? जर सत्य बाहेर आले तर खरा चेहरा आपल्यासमोर उघड होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोल्हे यांना दिला आहे.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ शिरुर येथे फडणवीस यांची सभा झाली. या सभेत फडणवीस यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली.

फडणवीस म्हणाले, आढळराव यांनी पक्ष बदलला नाही. मागच्या वेळी आम्ही पालघरमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितले जागा आणि उमेदवार द्या, आम्ही आमचा खासदार उद्धव ठाकरे यांना दिला आणि पुन्हा निवडूनही आणले आहे. त्यामुळे एका विचारात काम करीत असताना या ठिकाणी पक्ष बदलला असे काही नाही, आम्ही ठरवून हे केले आहे. समोरच्या उमेदवाराने पक्ष बदलला असे म्हणत असेल तर त्यांनी किती वेळा निष्ठा बदलली? गेल्या पाच वर्षात किती फेसबूक पोस्ट टाकल्या. किती वेळा कुठे-कुठे जाणार होते. ते कसे कसे थांबले हे सांगितले तर त्यांचा खरा चेहरा आपल्या समोर उघड होईल, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

आढळरावांपेक्षा एका गोष्टीत अमोल कोल्हे हे सरस आहेत. आढळराव हे नाटककार नाहीत. आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही. ते एवढे नाटकी आहेत. त्यांना रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते. पण एक लक्षात ठेवा हे मी त्यांना सुद्धा सांगतो. लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही. शिरुरच्या जनतेनं एकदा तिकीट घेतलं आहे.

शिरुरची लोकं खरंच हुशार आहेत. मी पाहिलं पाच वर्ष हा गडी फिरकला नाही. आता ते गावोगावी जातात. लोकंही बोलावतात स्वागत करतात, हार घालतात. समोरच्यालाही वाटतं वा.. काय स्वागत केलं अन् नंतर लोकं हळूच विचारतात पाच वर्षे कुठे होता सांगा? खरंच जबरदस्त लोकं आहेत तु्म्ही असे फडणवीसांनी म्हणताच सभेतील लोकांनीही त्यांना हसून दाद दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -