Wednesday, July 9, 2025

घरातील या ४ चुकांमुळे टिकत नाही पैसा, कुटुंबात राहते तंगी

घरातील या ४ चुकांमुळे टिकत नाही पैसा, कुटुंबात राहते तंगी

मुंबई: घरात अनेकदा माहीत नसताना काही चुका अशा ज्या समस्या निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला आर्थिक समस्या रोखायच्या असतील तर या चुका करू नका.


वास्तुशास्त्रानुसार पाणी वाया घालवणे हे म्हणजे धन नुकसान करण्यासारखे आहे. जर घरात कोणत्याही कामाशिवाय पाणी वाया जात असेल तर ते थांबवणे गरजेचे असते.


कधीही घर अथवा तिजोरी अथवा पैसे ठेवण्याची जागा पूर्णपणे रिकामी ठेवू नये. या चुकीमुळे तुम्हाला आर्थिक समस्या सतावू शकतात. असे केल्याने धनलक्ष्मी नाराज होते.


ज्यांच्या घरात साफ-सफाई नसते आणि नेहमीच घाणेरडेपणा असतो अशा घरात आर्थिक समस्या येतात.


लक्ष्मी मातेला घाणेरडेपणा आवडत नाही. जिथे घाण असेल तिथे लक्ष्मी माता कधीच वास करत नाही.


तसेच घरात तुळशीचे झाड असेल तर ते कधीच सुकू देऊ नये.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा