अहमदाबादच्या १६ शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!

  27

शाळांना धमकीचे इमेल आल्याने खळबळ


अहमदाबाद : आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान देशभरात पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर गुजरातच्या अहमदाबादमधील १६ शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. यामध्ये शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ४ शाळांचा समावेश आहे.


सोमवारी या शाळांना धमकीचे ई-मेल आल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांचेही यामुळं चांगलचं धाबं दणाणलं आहे. अहमदाबादचे पोलीस सहआयुक्त शरद सिंघल यांनी सांगितलं की, अहमदाबाद शहरातील १२ शाळा आणि अहमदाबाद ग्रामीण भागातील ४ मतदारसंघातील शाळांना सकाळी ६ वाजता ई-मेल प्राप्त झाले. रशियन डोमेनवरुन त्यांना हे ईमेल आले आहेत. ईमेलमधून शाळांना धमकी देण्यात आली होती. "तुमच्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे" असा मजकूर या ईमेलमध्ये आहे.


या ईमेलची गंभीर दखल घेत पोलिसांनी ज्या शाळांना हे ईमेल आले तिथं कोंबिंग ऑपरेशन राबवलं. पण यामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही. त्यामुळं हा धमकीचा ई-मेल म्हणजे अफवा होती हे स्पष्ट झालं आहे. असाच मिळताजुळता मजकूर असलेले ईमेल १ मे रोजी दिल्लीतील १५० शाळांना आले होते. त्यावेळीही तपासात काहीही निष्णन्न झालं नव्हतं.


दरम्यान, अहमदाबादचे पोलीस याच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्याचबरोबर सायबर क्राईम विभागात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये