Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीअहमदाबादच्या १६ शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!

अहमदाबादच्या १६ शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!

शाळांना धमकीचे इमेल आल्याने खळबळ

अहमदाबाद : आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान देशभरात पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर गुजरातच्या अहमदाबादमधील १६ शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. यामध्ये शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ४ शाळांचा समावेश आहे.

सोमवारी या शाळांना धमकीचे ई-मेल आल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांचेही यामुळं चांगलचं धाबं दणाणलं आहे. अहमदाबादचे पोलीस सहआयुक्त शरद सिंघल यांनी सांगितलं की, अहमदाबाद शहरातील १२ शाळा आणि अहमदाबाद ग्रामीण भागातील ४ मतदारसंघातील शाळांना सकाळी ६ वाजता ई-मेल प्राप्त झाले. रशियन डोमेनवरुन त्यांना हे ईमेल आले आहेत. ईमेलमधून शाळांना धमकी देण्यात आली होती. “तुमच्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे” असा मजकूर या ईमेलमध्ये आहे.

या ईमेलची गंभीर दखल घेत पोलिसांनी ज्या शाळांना हे ईमेल आले तिथं कोंबिंग ऑपरेशन राबवलं. पण यामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही. त्यामुळं हा धमकीचा ई-मेल म्हणजे अफवा होती हे स्पष्ट झालं आहे. असाच मिळताजुळता मजकूर असलेले ईमेल १ मे रोजी दिल्लीतील १५० शाळांना आले होते. त्यावेळीही तपासात काहीही निष्णन्न झालं नव्हतं.

दरम्यान, अहमदाबादचे पोलीस याच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्याचबरोबर सायबर क्राईम विभागात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -