मुंबई: सुरक्षित गुंतवणूक आणि जोरदार रिटर्नच्या बाबतीत काही काळापासून फिक्स डिपॉझिट स्कीम्सला अधिक लोक अधिक पसंती करतात. बऱ्याच बँका येथे एफडी करण्यासाठी ग्राहकांना शानदार व्याज ऑफर करत आहेत.
मात्र काही बँका, फिक्स डिपॉझिटवर ९ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. अशातच आम्ही ५ अशा बँका सांगत आहोत ज्या जास्त व्याज देत आहोत.
या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर युनिटी स्मॉल फायनान्स बँक आहे जी एफडीवर ९ टक्के व्याज देत आहेत.
या बँकमध्ये १००१ दिवसांच्या मॅच्युरिटीवर एफडी केल्यास वार्षिक आधारावर ९ टक्के व्याज मिळते.
दुसरी बँक आहे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक जे दोन वर्षाच्या एफडीवर ८.६५ टक्के व्याज देत आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकही या लिस्टमध्ये येथे १५ महिन्यांच्या मॅच्युरिटीवर फिक्स डिपॉझिटवर ८.५ टक्के व्याज ऑफर करत आहे.
इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक तुम्हाला ८.५ टक्के व्याज मिळवण्यासाठी ४४४ दिवसांनी मॅच्युअर होणाऱ्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी लागेल.