दिनेश पाटील, गणेश गायकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
पेण (देवा पेरवी): पेण मधील साई भक्तांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना आपला पाठिंबा पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दिनेश पाटील, गणेश गायकर यांनी बोरगाव येथे पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
पेण, बोरगाव येथील सेलिब्रेशन रिसॉर्ट मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला साई भक्त दिनेश पाटील, गणेश गायकर, दिनेश खामकर, महेश पाटील, गणेश जांभळे, संजय साळुंखे, विलास पाटील, सचिन पाटील, सूरज पाटील, राजेश म्हात्रे, प्रसाद पाटील, जयहिंद म्हात्रे, समीर तांडेल, स्वप्नील रामाने, अमित पाटील आदींसह असंख्य साई भक्त उपस्थित होते.
देशाची धुरा सांभाळण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, मध्यम वर्गीय व सर्वच वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे साई भक्त दिनेश पाटील यांनी म्हटले.
तर मागील दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर महासत्ता होण्याच्या मार्गांवर आहे. देशाला पुढे नेण्यासाठी मोदीच हवे आहेत. त्यांच्या साठी रायगड मधील महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना निवडून देण्यासाठी आम्ही सर्वं साईभक्त पुढे आलो असल्याचे समाजसेवक साईभक्त गणेश गायकर यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी त्यांनी संपूर्ण शिवा ग्रुप, मेहतर ग्रुप, बोरगाव ग्रुपनेही पाठिंबा जाहीर केला.