Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीBrazil flood : ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार! ५७ हून अधिक मृत्यू तर हजारो...

Brazil flood : ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार! ५७ हून अधिक मृत्यू तर हजारो लोक बेपत्ता

ब्राझिलिया : एकीकडे राज्यात उन्हाचा तडाखा बसत आहे, तर ब्राझीलमध्ये पावसाने धुमाकूळ (Brazil rain) घातला आहे. ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे पूर (Flood)आणि भूस्खलनामुळे (Landslide) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल (Rio Grande do Sul) या राज्यात त्याचा सर्वाधिक कहर होत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. पुरामुळे हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत.

ब्राझीलमध्ये या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर हजारो लोक बेपत्ता आहेत. बचाव पथक बचाव कार्यात गुंतले आहे. नुकतेच आलेल्या आकडेवारीनुसार विनाशकारी पुरामुळे २८१ नगरपालिका प्रभावित झाल्या आहेत आणि किमान ७४ लोक जखमी झाले आहेत.

६७ हजारांहून अधिक लोकांचं नुकसान झालेल्या भागात स्थानिक सरकारने आपत्तीची स्थिती घोषित केली आहे आणि ४,५०० हून अधिक लोक तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये आहेत. काही भागात छतांपर्यंत पाणी पोहोचले आहे. बचाव पथके लोकांचा आणि पाळीव प्राण्यांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. काल सकाळी, जोरदार पावसामुळे गुआइबा सरोवरातील पाण्याची पातळी पाच मीटरने वाढली, ज्यामुळे राज्याची राजधानी पोर्टो अलेग्रेला धोका निर्माण झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रिओ ग्रांदे डो सुलला पुराचा मोठा फटका

रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याचा परिणाम नदीच्या बंधाऱ्यांवरही होत आहे. १.४ दशलक्ष लोकसंख्येचे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या पोर्टो अलेग्रेला पुराचा विशेष फटका बसला. येथे, शहरातून वाहणारी गुआइबा नदी ५.०४ मीटर किंवा १६.५ फूट इतकी प्रचंड पूर उंचीवर आहे, ती ४.७६ मीटरच्या धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त आहे.

पुरामुळे घरापासून ते रस्त्यांपर्यंत सर्व काही पाण्याने भरलेले आहे. शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्यांवर बोटी फिरत आहेत. बुडून घरे उद्ध्वस्त झाली आहेत. रस्त्यावर इकडे-तिकडे वाहनेही अडकली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -