Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीMegha Dhade : राहुल गांधी माझा देश सोडा आणि नरकात जा!

Megha Dhade : राहुल गांधी माझा देश सोडा आणि नरकात जा!

मराठी अभिनेत्री मेघा धाडेने व्यक्त केला तीव्र संताप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आजवर अनेक कलाकारांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे. नुकतेच अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हिने भाजपाला साथ दिली तर काही महिन्यांपूर्वीच ‘बिग बॉस’ फेम मराठी अभिनेत्री मेघा धाडेनेही (Megha Dhade) भाजपामध्ये प्रवेश केला. मेघा धाडे सोशल मीडियावर सक्रिय असते आणि राजकारणाविषयी अनेकदा आपलं मतही मांडत असते. यातच तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर काँग्रेस नेते राहुल गांधींचा (Rahul Gandhi) एक व्हिडीओ शेअर करत त्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ‘राहुल गांधी माझा देश सोडा आणि नरकात जा’, असं ती म्हणाली आहे.

मेघा धाडे हिने राहुल गांधी यांचा एक रील व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने राहुल गांधी यांना टॅग करत तिचा राग व्यक्त केला आहे. भाजपचे नेते राजेश पांडे यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. जो मेघाने तिच्या स्टोरीला पोस्ट केला आहे. यामध्ये राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा वारंवार बाजूला सारण्याचा प्रयत्न करतायत.

राजेश पांडे यांनी ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साठी आदर नाही त्यांच्या साठी पुणेकरांच्या मनात जागा नाही, काँग्रेस च्या राहुल गांधी चा धिक्कार असो, आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर राहुल गांधी ने पुण्याच्या सभेत केला, असा आरोपही त्यांच्यावर केला आहे. हिच पोस्ट मेघाने शेअर करत राहुल गांधी यांच्यावर संताप व्यक्त केला.

मेघा धाडेने हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं की, जे राहुल गांधी यांना सपोर्ट करतात, त्यांची लाज वाटते. राहुल गांधी मी तुमचा तिरस्कार करते. माझा देश सोडा आणि नरकात जा. सध्या मेघाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -