Monday, July 15, 2024
Homeक्रीडाIPL 2024KKR vs LSG: एकाना मैदानात कोलकत्ताचा राडा, लखनौला पाजला पराभवाचा काढा...

KKR vs LSG: एकाना मैदानात कोलकत्ताचा राडा, लखनौला पाजला पराभवाचा काढा…

KKR vs LSG: लखनौ विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीला आली. कोलकातासाठी सलामीसाठी आलेल्या सुनील नरेन आणि फिल सॉल्ट यांच्यात ६१ धावांची भागीदारी झाली. नवीन-उल-हकने ही खेळी मोडित काढली. तर नरेनने ८१ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६चौकार आणि ७ षटकार आले. रवी बिश्नोईने त्याच्या आक्रमक खेळीला ब्रेक लावला.

कोलकत्ताला तिसरा धक्का आंद्रे रसेलच्या रूपाने बसला. नवीन-उल-हकच्या चेंडुवर केवळ १२ धावा करत तो बाद झाला. तर रमणदीप आणि व्यंकटेश नाबाद राहिले. लखनौसाठी नवीन-उल-हकने ३ बळी घेतले. तर यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि युधवीर सिंग यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.कोलकत्ताने २० षटकांत ६ गडी गमावून २३५ धावा केल्या. या सामन्यात केकेआरने केलेल्या दमदार सुरुवातमुळे लखनौसमोर धावांचा डोंगर उभा राहिला.

कोलकत्ताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ आक्रमक खेळी करण्यात असमर्थ ठरले. सलामीला आलेला अर्शीन कुलकर्णी दुसऱ्याच षटकात बाद झाला. संघाचा कर्णधार केएल राहुल देखील काही खास प्रदर्शन करु शकला नाही. २५ धावा बनवत हर्षित राणाच्या चेंडुवर बाद झाला.

कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सवर ९८ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. लखनौचा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला. केकेआरने लखनौसमोर विजयासाठी २३६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. लखनौला धड २० ओव्हरही खेळता आलं नाही. कोलकाताच्या गोलंदाजांनी लखला १६.१ ओव्हरमध्ये १३७ धावांवर गुंडाळलं. कोलकाताचा हा आठवा विजय ठरला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -