Monday, July 15, 2024
Homeक्रीडाIPL 2024IPL 2024: विराट कोहलीने रचला इतिहास, आयपीएलमध्ये असे करणारा ठरला पहिला फलंदाज

IPL 2024: विराट कोहलीने रचला इतिहास, आयपीएलमध्ये असे करणारा ठरला पहिला फलंदाज

मुंबई: आयपीएल २०२४च्या(ipl 2024) ५२व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला चार विकेटनी हरवले. आरसीबीच्यया विजयात विराट कोहलीची भूमिका महत्त्वाची ठरली. कोहलीने २७ बॉलवर ४२ धावा ठोकल्या. यात दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

कोहलीने आरसीबीच्या विजयासोबतच एक मोठा रेकॉर्ड बनवला. कोहली आता आयपीएलच्या विजयात ४००० धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या बाबतीत शिखर धवन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आयपीएल विजयात आतापर्यंत ३९४५ धावा केल्या आहेत.

कोहलीने आयपीएल विजयात ४०३९ धावा केल्या. तर ३७६६ धावा धावा त्याने आपल्या संघाच्या पराभवादरम्यान बनवल्या आहेत.

आयपीएल विजयामध्ये सर्वाधिक धावा

विराट कोहली – ४०३९ धावा
शिखर धवन – ३९४५ धावा
रोहित शर्मा – ३९१८ धावा
डेविड वॉर्नर – ३७१० धावा
सुरेश रैना – ३५५९ धावा

कोहलीने आतापर्यंत २४८ आयपीएल सामन्यांमध्ये ३८.४४च्या सरासरीने ७८०५ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून आठ शतके आणि ५४ अर्धशतके निघालीत. कोहलीने आयपीएल २०२४मध्ये आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ६७.७५च्या सरासरीने ५४२ धावा केल्या. कोहली सध्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -