मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळेस महिला टी-२० वर्ल्डकप बांगलादेशमध्ये खेळवला जात आहे. या वर्ल्डकपचे उद्घाटन सामना ३ ऑक्टोबरला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. तर सहा वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ अभियानाची सुरूवात क्वालिफायर-१विरुद्ध कऱणार.
भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तानही
भारताला ग्रुप एमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि क्वालिफायर-१ सोबत ठेवले आहे तर ग्रुप बीमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि क्वालिफायर- २ आहेत. ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी केपटाऊनमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेला हरवत रेकॉर्ड ब्रेक सहाव्यांदा खिताब जिंकला होता. भारतीय संघाची जबरदस्त कामगिरी २०२०मध्ये झाली होती. तेव्हा ते फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरले होते.
Mark your calendars 🗓️
Unveiling the fixtures for the ICC Women’s #T20WorldCup 2024 👇https://t.co/yKKfvEGguZ
— ICC (@ICC) May 5, 2024
भारतीय महिला संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध ४ ऑक्टोबरला सिलहटमध्ये रंगेल. तर ६ ऑक्टोबरला त्यांचा सामना पाकिस्तानविरुद्ध रंगेल. ९ ऑक्टोबरला ते क्वालिफायर-१विरुद्ध खेळतील. भारताचा शेवटचा ग्रुप सामना १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होईल.
भारतीय महिला टी-२० संघाचे वेळापत्रक
४ ऑक्टोबर भारत विरुद्ध न्यूझीलंड, सिलहट
६ ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान, सिलहट
९ ऑक्टोबर भारत विरुद्ध क्वालिफायर -१, सिलहट
१३ ऑक्टोबर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिलहट
१७ ऑक्टोबर पहिला सेमीफायनल सामना, सिलहट
१८ ऑक्टोबर दुसरा सेमीफायनल सामना, ढाका
२० ऑक्टोबर फायनल, ढाका.