Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

Chandrashekhar Bawankule : याकुबच्या कबर सुशोभिकरणानंतर आता काँग्रेसला कसाबचा पुळका!

Chandrashekhar Bawankule : याकुबच्या कबर सुशोभिकरणानंतर आता काँग्रेसला कसाबचा पुळका!

वडेट्टीवारांची भूमिका पाकिस्तान धार्जिणी; भाजपला विरोध म्हणून दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळतायत

चंद्रशेखर बावनकुळे यांचा जोरदार पलटवार

मुंबई : भाजपने उत्तर-मध्य मुंबईतून ॲड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर मुंबई बॉम्बब्लास्ट प्रकरण (Mumbai Blast Case) चर्चेत आले आहे. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी सुरु आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नुकताच एक दावा केला असून त्यात त्यांनी दहशतवादी कसाबची बाजू घेतली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी वडेट्टीवारांवर जोरदार पलटवार केला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा खून दहशतवादी कसाबच्या बंदुकीने झाला नव्हता, तर ती गोळी आरएसएस संघाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याची होती, असे म्हटले. शिवाय निकम यांनी हे सत्य न्यायालयापासून लपवून ठेवले. या देशद्रोह्याला भाजपने उमेदवारी दिली, असा आरोप त्यांनी केला. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 'याकुबच्या कबर सुशोभिकरणानंतर आता काँग्रेसला कसाबचा पुळका आला आहे', अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर विजय वडेट्टीवार यांचा व्हिडीओ पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला.

निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा. जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले त्यांनी दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं आता कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Comments
Add Comment