Sunday, October 26, 2025
Happy Diwali

"...मग बघू कोण कोणाला गाडतो", नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान

कुडाळ (प्रतिनिधी): रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित महायुती कार्यकर्ता मेळाव्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संबोधित केले. या भेटी दरम्यान गावकऱ्यांनी नारायण राणे यांचा मोठ्या उत्साहात स्वागत करत सत्कार केला. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी ७ मे रोजी कमळ निशाणी समोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.

सभेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्रमक होत म्हणाले की, "माझ्याबद्दल काल जे वक्तव्य केले त्यानंतर कोकणचा माणूस संतप्त झाला आहे. त्यांना तो धडा शिकवेलच. गाडून टाकण्याची भाषा कोणी करू नये. हिंमत असेल तर तुम्ही तुमचे संरक्षण काढून या. मी पण संरक्षण काढतो. आमने-सामने येऊ मग बघू कोण कोणाला गाडून टाकतात ते."

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की, गेली ४० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी काम करत आहे. या जिल्ह्यांमध्ये विमानतळ, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण तसेच विविध प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले. पण ज्यांनी कधीही या जिल्ह्याला योगदान दिले नाही. ते आता सांगतात की, मी विमानतळ आणले. मुळात त्यांचा आणि सिंधुदुर्गचा संबंध नाही स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माहीत होते की, मी काय आहे. त्यामुळे त्यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून मी ओळखला जात होतो. आता गाडुन टाकण्याची भाषा जे करत आहेत, त्यांनी एकदा तरी आमने-सामने यावे आणि बघू कोण कुणाला गाडुन टाकतो, असे खुले आव्हान नारायण राणे यांनी पुन्हा दिले.

खासदारांनी कोणते काम केले ते त्यांनी दाखवावे. खासदार विनायक राऊत यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेल्या प्रकल्पांना विरोध केला विमानतळ होऊ नये म्हणून विरोध करणारे हेच आणि विमानतळाच्या उद्घाटनाला पाहुण्यांचे स्वागत करणारे हेच असा टोला मारून गेल्या दहा वर्षात खासदारांनी कोणते काम केले ते त्यांनी दाखवावे. असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये गोरगरीब जनतेसाठी केलेल्या योजना या तळागाळापर्यंत गेल्या आणि त्याचा लाभही जनता घेत आहे पुढील काळात तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्देश आहेत. त्यामुळे भाजपला साथ द्या आणि तुमचा विकास करून घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >