
मुंबई:आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४ची(icc mens cricket world cup 2024) क्रिकेट चाहते अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. यावेळेस टी-२० वर्ल्डकप १ जूनपासून २९ जूनपर्यंत संयुक्त राज्य अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जात आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी सहयजमानपद निभावणाऱ्या अमेरिकेनेही आपल्या संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय यूएसए संघाचे नेतृत्व मोनांक पटेल करत आहे. मोनांकचा जन्म गुजरातच्या आनंद शहरात झाला होता. मोनांकने अंडर १९ स्तरावर गुजरातचे प्रतिनिधित्व केले होते मात्र त्यानंतर तो अमेरिकेत गेला.
उन्मुक्त-स्मितला मिळाली नाही जागा
मोनांक पटेलशिवाय भारतीय वंशाचे अनेक खेळाडू १५ सदस्यीय संघात आहेत. दरम्यान, उन्मुक्त चंदला संघात स्थान मिळालेले नाही. चंदच्या नेतृत्वात भारताने २०१२मध्ये अंडर १९ चा वर्ल्डकप जिंकला होता. विकेटकीपर फलंदाज स्मित पटेललाही संधी मिळालेली नाही.
It's almost time to defend our home turf in the @T20WorldCup! Here is our 15-player squad that will be representing the United States in the World Cup beginning on June 1!#WeAreUSACricket #T20WorldCup #TeamUSA #Cricket pic.twitter.com/phnzT2Ce48
— USA Cricket (@usacricket) May 3, 2024
संघात दोन उजव्या हाताच्या फलंदाजांचाही समावेश आहे. मिलिंदने २०१८-१९च्या रणजी ट्रॉफी सत्रात सिक्कीमचे प्रतिनिधित्व करताना १३३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्रिपुराचेही प्रतिनिधित्व केले. यानंतर तो चांगल्या संधीच्या शोधात अमेरिकेला गेला. २०२१मध्ये अमेरिकेत पदार्पण करण्याआधी तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स(आताची दिल्ली कॅपिटल) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.
टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिकेचा संघ - मोनांक पटेल(कर्णधार), आरोन जोन्स(उप कर्णधार), एंड्रीज गौस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंह, जेसी सिंह, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केनजिगे, सौरभ नेत्रावलकर, शॅडली वान शल्कविक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.रिझर्व्ह खेळाडू - गजानन सिंह, जुआनॉय ड्रिस्डेल, यासिर मोहम्मद.