Monday, December 2, 2024
Homeताज्या घडामोडीSaving Plan: दररोज वाचवा केवळ २५० रूपये आणि मिळवा २४ लाख रूपये

Saving Plan: दररोज वाचवा केवळ २५० रूपये आणि मिळवा २४ लाख रूपये

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही रक्कम वाचवत असतो. तसेच ही रक्कम अशा जागी गुंतवतो जिथे त्याचे पैसे सुरक्षित राहतील. तसेच चांगले रिटर्नही मिळतील. यासाठी अनेक सेव्हिंग्स प्लान्स आहेत. मात्र यातच एक सरकारी स्कीम आहे जी खूप प्रसिद्ध आहे. आम्ही बोलत आहोत पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बद्दल. लाँग टर्म इनव्हेस्टमेंटच्या हिशेबाने हा खूप चांगला प्लान आहे. या स्कीममध्ये तुम्ही दररोज २५० रूपयांची सेव्हिंग करून तुमच्यासाठी २४ लाख रूपयांचा फंड मिळवू शकता.

७ टक्क्याहून अधिक व्याज आणि टॅक्स फायदे

पब्लिक प्रॉव्हिडट फंडमध्ये गुंतवणुकीवर शानदार व्याज ऑफर केले जाते. सोबतच याच गुंतवणुकीच्या सुरक्षेची गॅरंटी सरकार देते. PPF Interest Rate बद्दल बोलायचे झाल्यास यात गुंवतणुकीवर ७.१ टक्के व्याजदर मिळतो. सोबतच पोस्ट ऑफिस स्कीममध्ये टॅक्सचे फायदेही मिळतात.

कसे जमाल कराल २४ लाख?

या स्कीममध्ये तुम्ही दररोज २५० रूपयांची बचत करून २४ लाख मिळवू शकता. जर तुम्ही दररोज २५० रूपये वाचवत आहात तर महिन्याचे ७५०० रूपये होतात. वर्षानुसार हा हिशेब पाहिला असता तुम्ही ९० हजार रूपये वाचवता. पीपीएफमध्ये इतका पैसा दरवर्षी १५ वर्षांपर्यंत करायचा आहे.

पीपीएफमध्ये गुंतवणुकीची मर्यादा १५ वर्षे आहे. म्हणजेच दरवर्षी ९० हजार रूपयांच्या हिशेबाने १५ वर्षात तुम्ही १३,५० हजार रूपये गुंतवता. यावर ७.१ टक्के व्याजदर पाहिले असता १०,९० ९२६ रूपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीला तुम्हाला एकूण २४,४०,९२६ रूपये मिळतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -