Friday, October 31, 2025
Happy Diwali

अक्षय्य तृतीयेला घरी आणा लक्ष्मी मातेच्या या प्रिय गोष्टी, वाढेल धनदौलत

अक्षय्य तृतीयेला घरी आणा लक्ष्मी मातेच्या या प्रिय गोष्टी, वाढेल धनदौलत

मुंबई: अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) सण प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला तिथी साजरी केली जाते. या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे.

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी सोने खरेदी केली जाते. लक्ष्मी मातेची विधीवत पुजा केली जाते. अशी पुजा करणे लाभदायक मानले जाते.

ज्योतिषाचार्य म्हणतात अक्षय्य तृतीयेच्या माता लक्ष्मीच्या प्रिय गोष्टी घरी आणल्याने ती व्यक्ती भाग्यवान बनू शकते. अशा लोकांच्या घरी नेहमी धनाची पेटी भरलेली राहते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या धातुच्या पादुका घरी आणणे शुभ असते. या पादुका घरातील मंदिरात स्थापित करा आणि नियमितपणे पुजा-अर्चना करा.

लक्ष्मी मातेला कवड्या प्रिय असतात. घरातील त्यांचा वास कायम असावा यासाठी या दिवशी कवड्या जरूर आणा. हा एक उपाय आर्थिक संकट दूर करू शकते.

अक्षय्य तृतीयेच्या एकाक्षी नारण अर्पण करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मात एकाक्षी नारळ लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते.

शास्त्रात दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मीजीचे भाऊ मानले आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणल्याने धनसंपदा वाढते.

अक्षय्य तृतीयेला घरी श्रीयंत्र आणि स्फटिकने बनलेला कासव आणल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.

Comments
Add Comment