मनसे नेते अविनाश जाधव यांनी झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला धमकावत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, अविनाश जाधव यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहे.
ठाणे मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला मारहाण केली तेव्हा तिथे पोलीससुद्धा होते. पोलिसांसमोरच त्यांनी मारहाण केली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अविनाश जाधव यांच्यासह दोघांवर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात खंडणी, मारहाण आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
View this post on Instagram
अविनाश जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांच्या हिशोबासाठी दादरमधील झवेरी बाजारात सराफा व्यापाऱ्याने बोलावलं होतं. तेव्हा अविनाश जाधव हेसुद्धा सोबत होते. तेव्हा काही कारणांनी वाद झाला आणि अविनाश जाधव यांनी सराफाच्या मुलाला मारले. त्यावेळी जाधव यांनी पाच कोटींची खंडणी मागितली असा आरोप सराफा व्यापाऱ्याने केला आहे.