Thursday, July 25, 2024
HomeदेशLoksabha Election 2024: मतदानाआधी दिल्ली काँग्रेसला झटका, माजी प्रदेश अध्यक्ष अरविंदर सिंह...

Loksabha Election 2024: मतदानाआधी दिल्ली काँग्रेसला झटका, माजी प्रदेश अध्यक्ष अरविंदर सिंह लवली भाजपमध्ये

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंह लवली, शीला सरकारमधील माजी मंत्री राजकुमार चौहान, माजी एमएलए नसीब सिंह, माजी एमएलए नीरज बसोया यांनी भाजपचा हात धरला आहे.

अरविंदर सिंह लवली यांनी नुकताच दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लवली हे काँग्रेसकडून आम आदमी पक्षाच्या गठबंधनविरोधात होते. ते आधी भआजपमध्ये होते. २०१७मध्ये दिल्ली नगरपालिका निवडणुकीआधी ते भाजपमध्ये सामील झाले होते. मात्र काही महिन्यांतच ते काँग्रेसमध्ये परतले होते.

२०१७मध्ये लवली यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये सामील झाले होते. त्यानंतर २०१८मध्ये त्यांनी भाजप सोडली आणि पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -