
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. अनंतनागमध्ये सैन्याचे एक वाहन दरीत कोसळले. या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला आहे. सुरूवातीच्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात वेरीनाग भागात हा अपघात घडला.
एका अधिकाऱ्याने सांगितले, १९ आरआरचे सैन्य वाहन बटागुंड वेरिनाग येथे रस्त्यावर नियंत्रण गमावल्याने दरीत कोसळले. या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला आहे तर ९ जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या जवानांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेले.
अनंतनाग पोलिसांनी दिला दुजोरा
अनंतनाग पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही बातमी दाखवली की दहशतवाद्यांनी बाटागुंड टॉप, डुरूमध्ये जवानाच्या वाहनावर हल्ला केला. मात्र या अफवा पूर्णपणे निराधार आहेत.