Wednesday, July 2, 2025

गुंतवणुकदारांसाठी खुशखबर, NSE देणार एका शेअरवर चार बोनस शेअर!

गुंतवणुकदारांसाठी खुशखबर, NSE देणार एका शेअरवर चार बोनस शेअर!

NSE: नॅशनल स्टॉक एक्सचेंज पात्र गुंतवणुकदारांच्या एका शेअरवर चार बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. गुंतवणुकदारांच्या मंजूरीनंतर बोनस शेअर जारी केले जातील, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. बोनस शेअर जारी करण्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही, असे कंपनीने सांगितले. NSE बोर्डाने मार्च 2024 मध्ये संपलेल्या वर्षासाठी प्रति शेअर 90 रुपये लाभांश जाहीर केला आहे, जो गुंतवणुकदारांच्या मंजुरीनंतर दिला जाईल.


हा लाभांश आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन असून एजीएमपासून ३० दिवसांच्या आत पात्र भागधारकांना पेमेंट केले जाईल. एक्सचेंज फाइलिंगमध्ये एनएसईने सांगितले की, ३१ मार्च २०२४ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी ९००० टक्क्यांच्या अंतिम लाभांशाची शिफारस केली असून ९० रुपये प्रति इक्विटी शेअर दिले होते. आगामी एजीएममध्ये भागधारकांद्वारे केले जाईल.

Comments
Add Comment