Tuesday, July 1, 2025

कोपर्डी आत्महत्या प्रकरणी दोन आरोपी अटकेत

कोपर्डी आत्महत्या प्रकरणी दोन आरोपी अटकेत

नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने येथील दलित तरुणाने आत्महत्या केली. यासंदर्भात तीनपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


बंटी बाबासाहेब सुद्रिक व वैभव मधुकर सुद्रिक अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आणखी एका आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.



सध्या कोपर्डी गावात शांतता असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Comments
Add Comment