Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीPrasad Oak : अशा ट्रेंडला वेळीच ठेचलं पाहिजे... मराठी इंडस्ट्रीत हे होऊ...

Prasad Oak : अशा ट्रेंडला वेळीच ठेचलं पाहिजे… मराठी इंडस्ट्रीत हे होऊ देणार नाही!

प्रसाद ओकने नेमका कशावर व्यक्त केला संताप?

मुंबई : हल्ली सोशल मीडियावर (Social media) इन्फ्लुएंसर्सची (Influencers) संख्या फार वाढली आहे. अनेकजण काहीतरी कंटेंट वापरुन छोटे छोटे व्हिडीओज बनवतात आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरतात. मनोरंजनाचा (Entertainment) भाग म्हणून या गोष्टीकडे पाहणं ठीक आहे, पण याच इन्फ्लुएंसर्सच्या फॉलोवर्सची संख्या पाहून त्यांना मोठ्या मोठ्या ऑफर्स दिल्या जातात. त्यामुळे खरा कलावंत मागे पडत असल्याचे चित्र आहे.

सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सना अशा प्रकारे काम देण्यास अनेक कलाकारांनी विरोध केला आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकनेही (Prasad Oak) संताप व्यक्त केला आहे. ‘अशा ट्रेंडला वेळीच ठेचलं पाहिजे, मराठी इंडस्ट्रीत हे होऊ देणार नाही!’ असं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद म्हणाला.

केवळ फॉलोवर्सची संख्या पाहून प्रोमोशनच्या दृष्टीने इन्फ्लुएंसर्सना काम दिलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स सध्याच्या काळात सेलिब्रिटी झाले आहेत. मात्र, कामाची गुणवत्ता ढासळत आहे. प्रसाद ओक यावर तीव्र नापसंती दर्शवत म्हणाला, हे अतिशय दुर्दैवी आहे. अत्यंत थर्ड क्लास क्राइटेरिया आहे हा की ज्यांचे फॉलोअर्स जास्त तो चांगला किंवा मोठा अ‍ॅक्टर आहे. हा हिंदीवाल्यांनी आणलेला ट्रेंड आहे; जो मराठीत रुजू पाहतोय. पण तो वेळीच ठेचला गेला पाहिजे आणि तो ठेचला जाईलच, असा विश्वास प्रसाद ओकने व्यक्त केला.

मराठी इंडस्ट्रीत हे होऊ देणार नाही

प्रसाद ओकने म्हटले की, मराठी सिनेसृष्टीत परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, प्रविण तरडे, रवी जाधव, विजू माने आणि मी स्वत: असे आम्ही अनेक सहकारी, दिग्दर्शक जे परफॉर्मन्सवर विश्वास ठेवणारे आहोत. तोपर्यंत फॉलोअर्सच्या कॅटेगिरीचा मराठी सिनेसृष्टीत कोणताही परिणाम होणार नाही किंवा मोठा फरक पडेल असे मला वाटत नसल्याचेही प्रसाद ओकने म्हटले. हिंदीत हा प्रकार सुरू आहे. पण एकदा त्यांना तो कलाकार कसा आहे हे कळल्यावर त्याला ते अनफॉलो करतील असेही त्याने म्हटले.

दरम्यान, प्रसाद ओक आता धर्मवीर-२, महापरिनिर्वाण, गुलकंद, पठ्ठे बापूराव, वडापाव आदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -