नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली आहे. पक्षाने रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे तर भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात अमेठी येथून किशोली लाल शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे.
काँग्रेसने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहित म्हटले, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत लोकसभा निवडणूक २०२४साठी राहुल गांधींना उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून काँग्रेस उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए श्री @RahulGandhi को उत्तर प्रदेश के रायबरेली से और श्री किशोरी लाल शर्मा को अमेठी से कांग्रेस उम्मीदवार घोषित किया गया है। pic.twitter.com/AyFIxI62XH
— Congress (@INCIndia) May 3, 2024
नामांकन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून उमेदवारांची घोषण केली. गेल्या पंचवीस वर्षांपासून केएल शर्मा अमेठी रायबरेलीमध्ये गांधी कुटुंब खासकरून सोनिया गांधींच्या नामांकनापासून ते प्रचाराची कमान सांभाळत आले आहेत. २००४मध्ये जेव्हा राहुल गांधींनी पहिल्यांदा अमेठी येथून पत्र भरले होते तेव्हा केएल तेथे उपस्थित होते. त्यानंतर आता २० वर्षांनी अमेठी येथून राहुलच्या जागी निवडणूक लढवत आहेत.