Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीवाशीतील केबीपी कॉलेजला नॅक कडून ए प्लस प्लस ग्रेड

वाशीतील केबीपी कॉलेजला नॅक कडून ए प्लस प्लस ग्रेड

नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद ( नॅक) यांच्याकडून चौथ्या टप्प्यात A++ ग्रेड बहाल करण्यात आले आहे. गत २३ व २४ एप्रिल २०२४ रोजी नॅकच्या तीन सदस्यीय समितीने महाविद्यालयाची तपासणी केली होती. या समितीमध्ये कुलगुरू प्रो.डॉ.कुलदीप शर्मा (चेअरमन), प्रो.पुष्पेंद्र सिंग (समन्वयक) आणि प्राचार्य डॉ. रामचंद्र राव यांचा समावेश होता.

या समितीने महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, संशोधन, अध्यापन, अध्ययन व मूल्यमापन प्रक्रिया, अभ्यासक्रम, महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि विद्यार्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या बेस्ट प्रॅक्टीसेस या निकषांच्या आधारावर तटस्थपणे मूल्यमापन केले. या समितीने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला सर्वोत्तम मानांकन या प्रकारातील ए प्लस प्लस ग्रेड ( स्कोअर-3.51) बहाल केले.

या सर्वोच्च मानांकनामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी आनंद व्यक्त करून महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी यांच्या कठोर परिश्रमाचे व योगदानाचे कौतुक केले. महाविद्यालयास उत्कृष्ट ग्रेड मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, रयतचे संघटक डॉ. अनिल पाटील सचिव विकास देशमुख, सहसचिव प्रिं.डॉ.ज्ञानदेव म्हस्के, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -