मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगला. एसआरएचने अतिशय रोमहर्षक पद्धतीने राजस्थानला एका धावेने हरवले. हा हैदराबादचा सहावा विजय आणि राजस्थानचा दुसरा पराभव होता. राजस्थानच्या या पराभवानंतरही पॉईंट्स टेबलमद्ये १६ गुणांसह ते अव्वल स्थानावर आहेत. त्यांचे प्लेऑफमध्ये खेळणे निश्चित झाले आहे.
राजस्थान रॉयल्सशिवाय असा कोणताही संघ नाही ज्यांच्याबद्दल खात्रीने सांगू शकतो की ते प्लेऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद १२-१२ गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्सने १० पैकी ५ सामने जिंकत पॉईंट्स टेबलमध्ये पाचवे स्थान मिळवले आहे. दिल्ली कॅपिटल्सने ११ सामन्यात १० गुण घेत सहावे स्थान मिळवले आहे.
आयपीएलच्या पहिल्या हाफमध्ये असे वाटत होते की चेन्नई सुपरकिंग्स अगदी सहज प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल. मात्र हैदराबादने राजस्थानवर विजय मिळवल्याने सीएसकेची समीकरणे बदलली. आयपीएलमध्ये जेव्हापासून १० संघ झाले आहेत तेव्हापासून प्लेऑफची समीकरणे बदलली आहेत. आधी १४ गुण मिळाल्यानंतरही संघ अगदी सहज प्लेऑफमध्ये खेळू शकत होता. आता १६ गुण झाल्यानंतरही प्लेऑफमध्ये खेळण्याची गॅरंटी नाही.
आयपीएलमच्या मागील दोन हंगामात प्लेऑफसाठी क्वालिफाय करणाऱ्या चार संघांपैकी ३ संघांचे १६हून अधिक अंक होते. चौथ्या संघाने १६ अंकांसोबत क्वालिफाय केले होते. यावेळेस ज्या संघाला प्लेऑफ खेळायचा आहे त्यांचे कमीत कमी १६ अंक असले पाहिजेत. या गणितानुसार चेन्नई सुपरकिंग्सला बाकी उरलेल्या चार पैकी तीन सामने कसेही करून जिंकले पाहिजे. दुसरीकडे टॉप ४मध्ये कोलकाता, लखनऊ, हैदराबाद जर आपले २ सामने जिंकले तर त्यांची प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्याची शक्यता अधिक होईल.
हैदराबादने राजस्थानला हरवत केवळ चेन्नई सुपरकिंग्सच नव्हे कप दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सच्या आशांवर पाणी फिरवले. गुजरात आणि पंजाबचे १० सामन्यात ८-८ गुण आहेत. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे ८-८ गुण आहेत. त्यांना एखादा चमत्कारच प्लेऑफमध्ये पोहोचवू शकतो.