मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या रँकिंगमध्ये भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या वार्षिक रँकिंग अपडेटमध्ये भारताने वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. मात्र कसोटी रँकिंगमध्ये ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.
वार्षिक अपडेटमध्ये २०२०-२१च्या सत्राचे निकाल हटवण्यात आले. नव्या रँकिंगमध्ये मे २०२४ नंतर पूर्ण झालेल्या सीरिजचा समावेश आहे. भारत प्रामुख्याने २०२०-२१मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेल्या २-१ विजयाचे निकाल हटवल्यानंर कसोटीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा इतक्या अंकांनी मागे
आता कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा चार अंकांनी मागे आहे. तर तिसऱ्या स्थानावर इंग्लंड आहे. दक्षिण आफ्रिका १०३ अंकांसह चौथ्या स्थानावर आहे.
आता ९ संघ कसोटी रँकिंगमध्ये सामील आहेत कारण अफगाणिस्तान आणि आयर्लंड रँकिंगमध्ये सामील होण्यासाठी गरजेच्या कसोटी खेळत नाही तर झिम्बाब्वेने गेल्या तीन वर्षांत केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. तीन वर्षांत कमीत कमी आठ कसोटी सामने खेळावे लागतात.
दरम्यान, वार्षिक अपडेटनंतर भारत वनडे आणि टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहेत. भारताचे १२२ अंक आहेत