
मुंबई: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगतो.
स्वप्नशास्त्रानुसार जर रात्रीच्या वेळेस झोपेत तुम्हाला पाऊस, नदी अथवा कोणतेही तलाव दिसला तर हे शुभ संकेत असतात.
स्वप्नशास्त्रानुसार अशास्वप्नांचा अर्थ आहे की लवकरच तुम्हाला मोठी रक्कम मिळणार आहे. स्वप्नशास्त्रानुसार नदी, पाऊस अथवा तलाव स्वप्नात दिसणे म्हणजे धन आगमनाचे संकेत आहेत. स्वप्नशास्त्रानुसार जर तुमच्या स्वप्नात मोठमोठे डोंगर, पर्वत दिसत आहेत तर हे ही चांगले संकेत आहेत.
जर असे तुम्हाला स्वप्नात दिसले तर समजून जा की तुम्ही लवकरच यशाची पायरी चढणार आहात. असे स्वप्न दिसले म्हणजे तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे त्यात तुम्हाला यश मिळणार.
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात उगवत्या सूर्याला बघणे अतिशय शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ होऊ शकतो की तुम्ही जीवनात मोठे यश मिळवणार आहात. सोबतच घर, जमीन अथवा वाहनाचे सुख मिळू शकते.