Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीघाबरू नका! फोन चोरी झाल्यास Paytm आणि Google Pay असे करा डिलीट

घाबरू नका! फोन चोरी झाल्यास Paytm आणि Google Pay असे करा डिलीट

मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल तर तुम्ही कसा दिवस घालवाल. आजकाल प्रत्येक लहान मोठी गोष्ट खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट केले जातात. मग ती मोठी रक्कम जरी असली तरी काही खरेदी करण्यासाठी आपण यूपीआयच्या मदतीने सहज पेमेंट करतो.

आपल्या फोनमध्ये अधिकृतपासून ते अनधिकृतपर्यंत सर्व डेटा असतो. सोबतच यूपीआय पेमेंट अॅप्सही असतात ज्याची आपल्याला गरज असते.

मात्र जर तुमचा फोन चोरी झाला अथवा कुठेतरी हरवला तर काय कराल? तुम्ही तुमचे पेटीएम आणि गुगल पे चे अकाऊंट परत कसे मिळवाल? जर तुम्हाला अकाऊंट डिलीट करायचे असेल तर अकाऊंट फोनशिवाय कसे डिलीट कराल. या अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही आज देत आहोत.

कसे डिलीट होणार पेटीएम अकाऊट

आपल्या फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ट्रान्झॅक्शन अॅप्सपैकी सर्वाधिक वापर पेटीएमचा केला जातो. जर तुमचा फोन चोरी झाला अथवा पडला तर त्या मोबाईलमधील अकाऊंट डिलीट करण्यासाठी सर्वात आधी पेटीएमला दुसऱ्या एखाद्या डिव्हाईसमध्ये इन्स्टॉल करा.

दुसऱ्या डिव्हाईसमध्ये आपल्या जुन्या अकाऊंटचे युजरनेम, पासवर्ड आणि नंबर टाकावा लागेल. अकाऊंट सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिल्या युजरला हॅमबर्गर मेन्यूवर जावे लागेल. तेथून प्रोफाईल सेटिंगमध्ये जात युजरला “Security and Privacy” सेक्शनमध्ये जावे लागेल.

या सेक्शनमध्ये तुम्हाला “Manage Accounts on All Devices” चा ऑप्शन मिळेल. येथे जाऊन युजरला अकाऊंट लॉगआऊट करावे लागेल. लॉगआऊट करताना सिस्टीम तुम्हाला विचारेल की तुम्ही हे करण्यासाठी शुअर आहात का तर त्यावेळेस तुम्हाला Yes हा पर्याय निवडावा लागेल.

या हेल्पलाईनला करा कॉल

जर ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यास कोणत्याची प्रकारची अडचण अथवा समस्या येत असेल तर तुम्ही पेटीएमचा हेल्पलाईन नंबर “01204456456” वर कॉल करून माहिती मिळवू शकता. याशिवा पेटीएमच्या वेबसाईटवर जाऊन “Report a Fraud” पर्यायवर क्लिक करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -