Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर कोपर्डीत तरुणाची आत्महत्या

विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर कोपर्डीत तरुणाची आत्महत्या

नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेने राज्य हादरले होते. या अत्याचाराच्या घटनेने देश पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता त्याच कोपर्डीतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाला काही जणांनी विवस्त्र करून मारहाण केली. त्याचे कपडे, मोबाइल आणि पैसेही काढून घेतले. या घटनेतून अपमानित झाल्याच्या भावनेतून तरुणाने थेट गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.


आत्महत्या केलेला तरुण हा कोपर्डी अत्याचार प्रकरणातील एका आरोपीचा चुलत भाऊ असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Comments
Add Comment