Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडी50MP सेल्फी कॅमेरा, Curved AMOLED डिस्प्लेसोबत लाँच झाला Vivo V30e 5G, जाणून...

50MP सेल्फी कॅमेरा, Curved AMOLED डिस्प्लेसोबत लाँच झाला Vivo V30e 5G, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

मुंबई: व्हिवोने आज अखेर आपला फोन भारतात लाँच केला आहे. विवोने या सीरिजमधील दोन फोन Vivo V30 आणि Vivo V30 Pro आधीच भारतात लाँच केले होते. आता कंपनीने या सीरिजमधील तिसरा फोन लाँच केला आहे.

Vivo V30e 5G हा गेल्या वर्षी लाँच झालेल्या Vivo V29e 5Gचे अपग्रेड व्हर्जन आहे. या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले, Snapdragon 6 Gen 1चिपसेटसह अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत.

Vivo V30e 5Gचे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले – या फोनमध्ये ६.७८ इंचाचा कर्व्ह एमोलेड डिस्प्ले, FHD+ रेझोल्युशन, 120Hz रिफ्रेश रेट, १३०० निट्स पीक ब्राइटनेस आणि सेंटर्ड पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे.

बॅक कॅमेरा – या फोनच्या मागच्या भागाला एक एलईडी फ्लॅश लाईटसह 50MP Sony IMX 882 मेन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर या फोनचा दुसरा बॅक कॅमेरा 8MP च्या अल्ट्रावाईड अँगल लेन्ससोबत येतो.

फ्रंट कॅमेरा – याफोनचा फ्रंट कॅमेरा 50MP आहे. जो f/2.2 अपर्चर आणि एका एलईडी फ्लॅश लाईटसोबत येतो.

प्रोसेसर – या फोनमध्ये प्रोसेसरसाठी Qualcomm Snapdragon 6 Gen 1 SoC चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

सॉफ्टवेअर – हा फोन Android 15 पर बेस्ड Funtouch OS 14 वर रन करतो.

बॅटरी – या फोनमध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.

कलर – हा फोन वेल्वेट रेड आणि सिल्क ब्लू कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

या फोनची किंमत

या फोनचा पहिला व्हेरिएंट ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेजसह याची किंमत २७९९९ रूपये आहे.

या फोनचा दुसरा व्हेरिएंट ८ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेजसह येतो. याची किंमत २९९९९ रूपये आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -