Tuesday, December 10, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीSwami Samartha : ‘हम गये नहीं, जिंदा है!’

Swami Samartha : ‘हम गये नहीं, जिंदा है!’

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

महाराजांनी एकदा निलेगावच्या भाऊसाहेब जागीरदारास शनिवारी येऊ, असे सांगितले होते. पण निलेगावला जाण्यापूर्वी स्वामी समर्थांचे महानिर्वाण ३० एप्रिल १८७८ शके १८०० असा तो दिवस मंगळवारचा होता. त्यानंतर चारच दिवसाने शनिवारी निलेगावच्या वेशीबाहेर मोठ्या वडाच्या झाडाखाली महाराज इतर सेवेकरांसह आले आहेत, ही बातमी समजताच, भाऊसाहेब त्यांचे कुटुंब तेथे आले. तेथे त्यांनी स्वामींची पूजा केली. त्यांना घरी येण्याविषयी आग्रह केला. तो दिवस होता शनिवार. पण श्री स्वामी समर्थांनी आपल्या दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊ, असे वचन दिले.

रात्र झाल्याने सर्व मंडळी घरी परतले. भोजन आटोपून परत सर्व मंडळी महाराज जेथे उतरले होते, तेथे परत आली. पाहतात तर महाराज अदृश्य झाले होते. सेवेकरीही नव्हते. भाऊसाहेब जहागीरदारांनी खूप शोध घेतला. अखेर निराश होऊन, ते परत घरी आले. श्री स्वामींनी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी परत येण्याचे वचन दिले होते. म्हणून स्वागताची सर्व तयारी करून, महाराज येण्याची वाट पाहू लागली. तोच महाराज सर्वांसमोर येऊन उभे राहिले. त्यांना भोजनासाठी विनवणी केली. पण एकही शब्द न बोलता जसे ते विराजमान झाले होते. तसेच अचानक अंतर्धान पावले.

स्वामींना शोधण्यासाठी भाऊसाहेबांनी माणसे धाडली. काही भक्त तर अक्कलकोटपर्यंत जाऊन आले. तेव्हा ते सर्व आश्चर्य चकित झाले. कारण महाराज चार दिवसांपूर्वीच म्हणजे मंगळवारी समाधिस्त झाल्याची त्यांना बातमी कळली. याचाच अर्थ असा की, स्वामी समर्थ नेहमी सांगतात ‘भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे’ आणि हम गये नहीं जिंदा है। भक्ताला दिलेल्या वचनाची पूर्तता स्वामी करतात. म्हणजेच स्वामी निर्गुण, निराकार, चैतन्य स्वरूपात आपल्या आवडत्या हजारो भक्तांना निरनिराळ्या ठिकाणी स्थळकाळाची पर्वा न करता आपल्या अस्तित्वाची खात्रीच करून देत असतात. म्हणजे अणू-रेणूमध्ये जसा ईश्वर भरून राहिलेला आहे, तसे स्वामींचे कार्यही भरून राहिलेले आहे. म्हणून भक्तांना स्वामींच्या आश्वासनाची प्रचिती येते, ते शब्द आहेत. हम गये नहीं, जिंदा है! याचाच अर्थ आपले आई-वडील, आजी-आजोबा व गुरू यांच्यातच तुमचा देव शोधा.

श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे,
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।

स्वामी पुण्यतिथी गीत

तुम्ही, आम्ही आणि स्वामी
अशक्य ते शक्य करतील स्वामी ।।१।।
होऊनी निर्भय घ्या तुम्ही अभय
पळून जाईल भूतप्रेतांचे भय ।।२।।
मोडून पडतील कुंपण व वय
चांगल्या कामाला बोलणार होय ।।४।।
क्रोधीष्ट मनात आणता स्वामी
नराचे केले नारी अतिकोपें स्वामी ।।५।।
हिमालयात चिनी टिंगल करे स्वामी
नारीचे केले नर त्वरित हसत स्वामी ।। ६ ।।
शरण येता धरिले स्वामी चरण
पुनरपी केले नराचे नारी उद्धरण ।।७।।
कबुल केले आयुष्यभरी स्वामीनाम पारायण
जसा झाला वाल्याकोळी वाल्मिकी नारायण ।।८।।
दत्तगुरु स्वतः सांगती घ्या स्वामी नाम
जिथे स्वामी तिथे दत्त, उभे राम नाम ।।९।।
साऱ्या जगात भरुनी राहिले स्वामी नाम
विठोबा राधाकृष्णात स्वामिनाम ।।१०।।
साईनाथ-गजानन महाराज, सारे स्वामी नाम
तुकाराम-रामदास-नामदेव सारे स्वामी नाम ।।११।।
हनुमान-जांबुवंत-अंगद तरले स्वामी नाम
बिभिषण-सुग्रीव तरले घेता राम नाम ।।१२।।
अहिल्या-सीता-तारा-मंदोदरी राम नाम
अनुसया-अत्री-विश्वामित्र दत्त नाम ।।१३।।
ब्रह्मा-विष्णू-महेश सारे दत्त नाम
दत्तगुरुचेच रूप परिपूर्ण स्वामी नाम ।।१४।।
स्वामीसुतासारखे जगभर करा स्वामी नाम
दिनरात काम करता-करता घ्या स्वामी नाम ।।१५।।
भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी शब्दात जादू
हम गया नही जिंदा है, स्वामींचीच खरी जादू ।।१६।।
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -