Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीनाशिकमध्ये महायुती करणार आज शक्तीप्रदर्शन

नाशिकमध्ये महायुती करणार आज शक्तीप्रदर्शन

डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे करणार अर्ज दाखल

नाशिक : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवार जाहीर करण्यात आला. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच गळ्यात पुन्हा उमेदवारीची माळ पडली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये लढत होईल. महाविकास आघाडी कडून उबाठा गटाचे राजाभाऊ वाजे निवडणूक लढवत आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गोडसे व पवार या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांकडून गुरुवारी (ता.२) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीकडून नाशिक शहरांमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याप्रमाणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी २९ एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महाविकास आघाडी कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. त्या शक्ती प्रदर्शनाला तोडीस तोड देण्याचा भाग म्हणून महायुती कडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. पन्नास हजार कार्यकर्ते आणण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन ४५ दिवस झाले मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नाही एक मे रोजी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले. प्रथम जागा निश्चिती व त्यानंतर उमेदवार जाहीर होण्यास विलंब झाल्याने महायुती बद्दल नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये नकारात्मक वारे वाहू लागले. विरोधकांकडून देखील तसा प्रचार सुरू झाला त्याला उत्तर देण्याचा भाग म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे महायुतीचे नियोजन आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -