Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीInstagram new policy : ओरिजीनल कंटेंट क्रिएटर्सना इन्स्टाग्रामकडून खुशखबर!

Instagram new policy : ओरिजीनल कंटेंट क्रिएटर्सना इन्स्टाग्रामकडून खुशखबर!

कंटेंट रिपोस्ट करणार्‍यांना बसणार आळा

मुंबई : अनेक लोकांपर्यंत झटक्यात पोहोचण्याचं इन्स्टाग्राम (Instagram) हे फार प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियामध्ये (Social Media) तरुणाईचं सर्वात लोकप्रिय असं हे अॅप आहे. अनेक तरुण-तरुणी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कंटेंट तयार करुन तो पोस्ट करत असतात. इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर्सची (Instagram Influencers) आजकाल खूप हवा आहे. चटकन संपणारे काही मजेशीर, काही इमोशनल व्हिडिओ लोकांना पाहायला आवडतात. मात्र, अनेकदा काही ओरिजीनल व्हिडिओ दुसर्‍या अकाऊंटवरुन रिपोस्ट केले जातात आणि ओरिजीनल कंटेंक क्रिएट करणार्‍याचे (Original content creator) व्ह्यूज अथवा लाईक्स (Views or likes) कमी होतात. या गोष्टीला आळा घालण्यासाठी इन्स्टाग्रामने काही नवीन नियम तयार केले आहेत.

अनेकदा ओरिजीनल कंटेंट असूनही फॉलोवर्स (Followers) कमी असल्याने तो जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. मात्र तोच व्हिडीओ एखादी जास्त फॉलोवर्स असलेली व्यक्ती रिपोस्ट करते आणि त्याला व्ह्यूज मिळतात मात्र मूळ माणसाला त्याचं श्रेय मिळत नाही. यासाठी इन्स्टाग्रामने आपल्या अल्गोरिदमसंदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर ओरिजिनल कंटेंटला जास्त प्राधान्य अशा हिशोबाने नियम बदलले आहेत.

इन्स्टाग्रामने एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. लहान कंटेंट क्रिएटर्सना या बदललेल्या अल्गोरिदममुळे फायदा होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसंच दुसऱ्यांचा कंटेंट रिपोस्ट करणाऱ्यांना यामुळे आळा बसणार आहे. कंपनीने नेमके काय बदल केले आहेत, जाणून घेऊया.

१. डुप्लिकेट कंटेंट

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामच्या रिकमेंडेशन फीडमधून आता रिपोस्ट केलेल्या पोस्टना हटवण्यात येणार आहे. यामुळे डुप्लिकेट कंटेंट कमी होण्यास मदत होईल. तसंच, दुसऱ्यांच्या पोस्ट वारंवार रिपोस्ट करणाऱ्या यूजर्ससाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. जर एखाद्या यूजरने ३० दिवसांच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांचा कंटेंट १० पेक्षा अधिक वेळा रिपोस्ट केला; तर त्या पोस्ट रिकमेंडेशनमध्ये घेण्यात येणार नाहीत.

२. पोस्ट-रिपोस्ट

इन्स्टाग्रामवर रिपोस्ट करुन हजारोंमध्ये व्ह्यू आणि लाईक्स मिळवणारे भरपूर अकाउंट आहेत. मात्र आता या अकाउंट्सना मिळणारा भाव कमी होणार आहे. एखादा रिपोस्ट केलेला कंटेंट व्हायरल जात असला, तरीही रिकमेंडेशनमध्ये ओरिजिनल पोस्टलाच प्राधान्य दिलं जाणार आहे.

३. लहान क्रिएटर्स

इन्स्टाग्रामच्या या बदललेल्या अल्गोरिदमचा फायदा लहान कंटेंट क्रिएटर्सना होणार आहे. ज्या लोकांना कमी फॉलोवर्स आहेत, मात्र ते ओरिजिनल कंटेंट पोस्ट करत आहेत त्यांना आता इन्स्टाग्राम अधिक संधी देणार आहे. यापूर्वी केवळ अधिक फॉलोवर्स असणाऱ्या यूजर्सना रिकमेंडेशनमध्ये प्राधान्य दिलं जात होतं, मात्र आता हे बदलणार आहे.

४. ओरिजिनल कंटेंट क्रिएटर

इन्स्टाग्रामवर आता ओरिजिनल कंटेंट शेअर करणाऱ्यांना वेगळी ओळख मिळणार आहे. ओरिजिनल पोस्टवर ‘ओरिजिनल कंटेंट क्रिएटर’ असं लेबल मिळणार आहे. यामुळे ती पोस्ट रिपोस्ट केल्यानंतर देखील ओरिजिनल कंटेंट कुणाचा आहे हे लक्षात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -